Advertisement

संभाव्य जनता कर्फ्युच्या प्रस्तावाला व्यापाऱ्यांचा विरोध

प्रजापत्र | Friday, 18/09/2020
बातमी शेअर करा

बीडः जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकित संभाव्य Lockdown च्या प्रस्तावाला व्यापारी संघटनांनी विरोध नोंदविल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढु लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुन्हा lockdown चा पर्याय चाचपला जात आहे. या लाँकडाऊनला जनता कर्फ्युचा चेहरा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. याच संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात जनता कर्फ्युच्या प्रस्तावाला बहुतांश  प्रतिनिधींनी विरोध नोंदविल्याची माहिती आहे. अगोदरच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता पुन्हा बंद म्हणल्यावर व्यावसायीकांवर फाशी घेण्याची वेळ येईल या पातळीवरच्या प्रतिक्रिया काही प्रतिनिधींनी व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान प्रशासन १० दिवसाच्या जनता कर्फ्युचा पर्याय चाचपत असल्याचा अंदाज बैठकीतिल चर्चेवरुन बांधला जात आहे. दसरा दिवाळीत व्यवहार सुरळित ठेवायचे असतील तर आता काही बंधने घालुन घ्यावी लागतील अशीही भूमिका प्रशासनाने मांडल्याची माहिती आहे. मात्र या बैठकिला प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान संभाव्य जनता कर्फ्युबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना विचारणा केली असता अजुन तसा काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement