आष्टी दि.२१ (वार्ताहर)-मागील तीन वर्षांपासून स्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी टाकळी अमियाच्या सरपंच निशा सावता ससाणे व बाळासाहेब भुकन यांनी मुलीच्या लग्नासाठी गरीब वधुपित्याला ५ हजारांची मदत आणि लग्नात गॅस सिलेंडरची भेट वस्तू देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.त्यांच्या या उपक्रमाची जिल्हाभर सध्या जोरात चर्चा सुरु आहे.
आतापर्यंत गरीब कुटुंबातील १०० नववधुच्या लग्नासाठी ५ हजार रुपये अशी ५ लाखांची मदत निशा ससाणे व बाळासाहेब भुकन यांनी केली आहे.यासह मोफत गॅस कनेक्शन देऊन सामाजिक बांधिलकी देखील जोपासली. शंभराव्या लग्नानिमित्त टाकळी अमिया येथे कन्यादान म्हणून वधूचे पित्याकडे ५ हजार धनादेश व गॅस कनेक्शनचे वितरण स्वखर्चाने सरपंच सावता ससाणे आणि युवा उधोजक बाळासाहेब भूकन यांनी युवा नेते अभयराजे धोंडे यांच्या हस्ते सुपूर्द केला.यावेळी दिनकर महाराज तांदळे,पत्रकार उत्तम बोडखे, अभिजित शेंडगे, पत्रकार प्रविण पोकळे,इंजि.पी.बी. बोडखे,भगवानराव शिनगिरे,अतुल मुळे,प्रमोद चौधरी,ज्ञानेश्वर खोटे,श्रीरंग चौधरी आदी उपस्थितीत होते.आष्टी तालुक्यातील टाकळीअमियाच्या सरपंच निशा सावता ससाणे यांनी स्वखर्चातून तीन वर्षापूर्वी सर्वधर्मियांसाठी सरपंच कन्यादान व यशोदीप कंन्ट्रक्शनचे मालक बाळासाहेब भूकन यांनी सावित्रीबाई फुले कन्यादान योजना सुरू केली असून याचा शेकडो गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे.