Advertisement

पोखरी शिवारातील तो मृतदेह हॉटेलमधील वेटरचा

प्रजापत्र | Wednesday, 20/10/2021
बातमी शेअर करा

आष्टी-तालुक्यातील पोखरी शिवारात सोमवारी सकाळी रोडच्या बाजुला एक अनोखळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह अंबाजोगाई येथे उत्तरीय तपासणीसाठी नेला होता.अखेर बुधवारी (दि.२०) मयताची ओळख पटली असून तो मृतदेह 
अहमदनगर येथे वेटर म्हणून काम करणाऱ्या परराज्यातील शेखर उर्फ रमेश पुजारी यांचा आहे. याप्रकरणात अद्याप घात कि अपघात हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार असल्याची माहिती  आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी दिली.
        आष्टी तालुक्यातील नगर-कडा- जामखेड- बीड राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी शिवारात सोमवारी सकाळी रोडच्या बाजुला जीन्स,पांढरा शर्ट, डाव्या कानाला जखम असलेला ३५ वर्षीय अनोखळी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी आष्टी पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आला होता.अखेर बुधवारी मृतदेहाची ओळख पटली असून तो परराज्यातील शेखर उर्फ रमेश पुजारी असून अहमदनगर येथे एका खानावळीत वेटर म्हणून काम करत असे.याप्रकरणात घात कि अपघात हे अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच याचे खरे कारण समोर येईल अशी प्रतिक्रिया  पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी दिली.

Advertisement

Advertisement