Advertisement

“भारतीय क्रिकेटचे पुनरागमन आता जवळ आले आहे" सुनील गावसकरांचं महत्त्वाचं वक्तव्य.

प्रजापत्र | Thursday, 17/09/2020
बातमी शेअर करा

भारतीय क्रिकेटचे पुनरागमन आता जवळ आले आहे आणि सारेच त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. IPL स्पर्धा ही स्थानिक क्रिकेटपटूंच्या प्रतिभेला व्यापक स्वरूप देते. मला खात्री आहे की यंदादेखील अनेक उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेत आपला ठसा उमटवतील. सध्या सर्वच संघ युएईमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष मुंबई विरूद्ध चेन्नई या सलामीच्या सामन्याकडे आहे. मला अशी अपेक्षा आहे की या स्पर्धेतून लाखो लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल.”, असे महत्त्वाचे विधान गावसकर यांनी केले.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो IPLमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई संघाचे नेतृत्व धोनी गेली अनेक वर्षे केले आहे. त्याच्याबद्दलही गावसकर यांनी मत व्यक्त केले. “धोनीला सारे जण जवळपास वर्षभराने क्रिकेट खेळताना पाहणार आहेत. मला नक्कीच खात्री आहे की सारेच जण त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत”, असे गावसकर म्हणाले.

Advertisement

Advertisement