Advertisement

पोखरी पुलाजवळ आढळला इसमाचा संशयास्पद मृतदेह

प्रजापत्र | Monday, 18/10/2021
बातमी शेअर करा

प्रवीण पोकळे 

आष्टी- तालुक्यातील अहमदनगर-जामखेड- बीड या राष्ट्रीय महामार्गावर पोखरी गावानजीक असलेल्या पुलाजवळ एका ४५ वर्षीय पुरुषाचा संशयास्पद मृतदेह आज (दि.१८) सकाळी आढळून आला.पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नसल्याने हत्या,आत्महत्या की अपघात याचे गुढ वाढले आहे.

         आष्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,अहमदनगर-जामखेड- बीड या राष्ट्रीय महामार्गावर पोखरी गावानजीक असलेल्या पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.मयताचे वय ४५ असून अंगात पांढरा शर्ट,लाल कलरचे बनियन,निळ्या कलरची जीन्स,पायात काळ्या-भगव्या कलरचे शूज,सावळा रंग,साडेपाच फूट उंची असे त्याचे वर्णन आहे.सदर इसमाची ओळख पटलेली नसून या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून पोलिसांनी प्रेत ताब्यात घेतले असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहे. आष्टी परिसर व आजूबाजूच्या तालुक्यात कोणाला या व्यक्तीची ओळख पटत असेल तर खालील नंबर वर संपर्क करावा पो. नि. सलीम चाऊस 8806166100,पो.उ.प.नि.प्रमोद काळे 8600591754,पो.ह. संतोष शिरसागर 9850907879 असे आवाहन करण्यात आले.

Advertisement

Advertisement