Advertisement

नांदूरमध्ये तणावाचे वातावरण

प्रजापत्र | Wednesday, 15/05/2024
बातमी शेअर करा

बीड-लोकसभा निवडणुकीचे मतदान 13मे ला संपल्यानंतर आता सोशल मीडियावर कोण विजयी होणार याच्या चर्चा रंगल्या असताना नांदूरमध्ये जातीय तणावाची परिस्थिती एका आक्षेपहार्य पोस्टमुळे निर्माण झाली आहे. दोन समाजातील गट समोरसमोर आल्यानंतर दगडफेकीच्या घटना घडल्या असून केज पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

      सोशल मीडियावर सध्या निवडणूक संपल्यामुळे वातावरण तापलेले आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या असताना काही जण ही निवडणूक जातीय समीकरणावर घेऊन आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.मनोज जरांगे यांच्या बाबतच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यानंतर याला वेगळे रुप प्राप्त झाले. त्यामुळे गावात वाद होऊन दोन गट समोरासमोर आल्याने घरावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नांदूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून घटनास्थळी केज पोलीस दाखल झाल्याची माहिती आहे.अद्याप हा प्रकार कशामुळे घडला हे समोर आलेले नसून पोलीस गावात आल्याने परिस्थिती नियंत्रणात येतं आहे.

Advertisement

Advertisement