Advertisement

  शिरूर कासार (प्रतिनिधी) : एकता फाउंडेशन, शिरूर कासार (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने 'हुतात्मा देवराव उगलमुगले साहित्य नगरी' मध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या चौथे एकता मराठी साहित्य संमेलन, पिंपळनेर ता.शिरूर का. जि.बीड च्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या कै.विश्वनाथ यादव कराड (गुरूजी) राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार. कै.विश्वनाथ शंकरराव पवार (से.नि.पोस्टमास्तर) राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार. स्वा.सै.गणपतराव बडे सार्वजनिक वाचनालय, लोणी ता.शिरूर का.जि.बीड राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार. कै.काशिनाथ आश्रुबा शिंदे (सर) राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.कै.काॅम्रेड टी.डी.शेलार (कामगार योद्धा) राज्यस्तरीय उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार.म.शेख चाँद शेखलाल (निवृत्त पोलिस) राज्यस्तरीय उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार. कै.परमेश्वर भागुजी कैतके राज्यस्तरीय उत्कृष्ट संशोधन/संपादन साहित्य पुरस्कार कै.के.टी.तांदळे राज्यस्तरीय उत्कृष्ट संकिर्ण (अध्यात्मिक, शेती, क्रिडा, प्रवासवर्णन सह इतर) साहित्य पुरस्कार
       

 

 

 उपरोक्त राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पुढील साहित्य/वाङ्मय प्रकारातील साहित्यकृती मागविण्यात येत आहेत - १) कथा, २) कविता, ३) कादंबरी, ४) बालसाहित्य (सर्व प्रकार), ५) ललित लेखन, ६) गझलसंग्रह, ७) संशोधन/संपादित साहित्य, ८) संकिर्ण (वरील साहित्यप्रकार वगळून अध्यात्मिक, शेती, क्रिडा, प्रवासवर्णन यांसह इतर सर्व)
         या पुरस्कारांसाठी ०१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेली सर्व पुस्तके पात्र आहेत.

         पुरस्काराचे स्वरूप :- ११११/- रूपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, पुष्पहार, गुलाबपुष्प आणि श्रीफळ असे राहिल.
         पुरस्कार निवड समितीद्वारा पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींची घोषणा झाल्यानंतर सदर पुरस्कार प्राप्त पुस्तकांच्या लेखक, कवी, कथाकार, साहित्यिकांना निवडपत्र पाठवून आणि भ्रमणध्वनीद्वारेही तसे अवगत केले जाईल. पुरस्कारार्थींना सदर राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण चौथे एकता मराठी साहित्य संमेलन, पिंपळनेर येथील कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक केले जाईल. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संमेलनाच्या दिवशी कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पुरस्कार स्विकारता येईल. प्रतिनिधींकडे अथवा पोस्टाने पुरस्कारांचे वितरण केले जाणार नाही.
         यंदाचे वर्ष हे राज्यस्तरीय पुरस्कारांचे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकता मराठी साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना एकता फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले होते.
         महाराष्ट्रभरातील सन्माननीय साहित्यिकांचा समावेश असलेली पुस्तक परीक्षण समिती आणि त्यानंतर पुरस्कार निवड समिती या दोन समितीवरील जेष्ठ परीक्षांकडून राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी योग्य त्याच पुस्तकांची निष्पक्षपातीपणे निवड केली जाते. पुरस्कार निवडीसंदर्भातील एकता फाउंडेशनने नेमलेल्या पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
         तरी, उपरोक्त कालावधीत ज्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत अशा महाराष्ट्रभरातील कवी, कथाकार, कादंबरीकार, लेखक, संशोधक, संपादक, साहित्यिकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती, स्वतःचा पासपोर्ट फोटो आणि परीचयपत्र पुढील पत्त्यावर ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावे असे आवाहन एकता फाउंडेशन, शिरूर कासार जि.बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

साहित्य पाठविण्याचा पत्ता -
साहित्यिक अनंत कराड.
(अध्यक्ष - एकता फाउंडेशन, शिरूर कासार)
"निर्मल सदन" भगवान चौक, बीड - रोड, शिरूर कासार. 
ता. शिरूर कासार, जि. बीड. पिन - ४१३२४९.

संपर्क : ७४९९२०३५१०, ९८८१००४४२२, ८८८८४०३९९५, ९७६४४०७०३०, ९९२२३१५८४८.

Advertisement

Advertisement