Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न मार्गी

प्रजापत्र | Wednesday, 13/10/2021
बातमी शेअर करा

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास आपण कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३०लाख रुपयांचा निधी मिळणार आहे त्यातून कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली. कोरोनाकाळात एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडाले आणि कर्मचाऱ्यांना वेतन देणेही कठीण झाले. ऑक्टोबरचा पंधरवाडा संपत येत असला तरी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये देय असलेले वेतनही मिळालेले नाही. मात्र, आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे ९३ हजार कर्मचाऱ्यांना  सप्टेंबर महिन्याचे वेतन आता मिळेल,अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली

Advertisement

Advertisement