Advertisement

नाट्यगृह,सिनेमा हॉल पन्नास टक्यासह उघडणार

प्रजापत्र | Tuesday, 12/10/2021
बातमी शेअर करा

मुंबई – शाळा आणि धार्मिक स्थळ सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता २२ऑक्टोबर पासून राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपट गृहे उघडण्यात येणार आहेत,मात्र आसन क्षमतेसह काही बंधन पाळावी लागणार आहेत असे शासनाने स्पष्ट केले आहे .

चित्रपटगृह उघडण्याचा आणि इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नवी नियमावली जाहिर केली आहे.

या नव्या नियमावलीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच मास्क आणि सॅनिटासझरचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करणं बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करण्याची परवानगी नसणार आहे.

सर्वांना आरोग्य सेतू ऍपचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि प्रेक्षक सर्वांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. कलाकारांना कक्षात जाऊन भेटण्याची परवानगी नाही. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करणं बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement