बीडः आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या बाबरी मस्जिद पतन प्रकरणाचा निकाल लखनौच्या न्यायालयात ३० सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारतींसह भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित अनेकांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली होती.यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल होते. एक गुन्हा कारसेवकांविरोधात तर दुसरा भाजप नेत्यांविरोधात दाखल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात आडवाणी, जोशींविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. तर दोन वर्षात सुनावणी संपविण्याचे निर्देश न्यायालयाला दिले होते. तर आँगस्ट २०२० मध्ये न्यायालयाला आणखी एक महिण्याची मुदत देण्यात आली होती. ती ३० सप्टेंबर ला संपत आहे. त्यामुळे लखनौच्या सीबीआय न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल ३० सप्टेंबर रोजी देणार असल्याचे जाहिर केले असुन सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने यापुर्वीच बाबरी मस्जिद पाडणे बेकायदेशीर होते असे म्हटले आहे.