Advertisement

विजेची तार अंगावर पडल्याने वृद्धाचा मृत्यू

प्रजापत्र | Friday, 08/10/2021
बातमी शेअर करा

तलवडा - दि.०८ (वार्ताहर)- गोदावरी नदी पात्रात आंघोळीला जात असताना वीज पुरवठा करणारी विजेची तार अंगावर पडल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडापासून जवळच असलेल्या भोगलगाव येथे आज सकाळी धोंडीराम रामा कांबळे (वय ६५) हे आंघोळीला जात असताना लोंबकळत असलेले तार अचानक त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये जबरदस्त शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतचे राणोजी यशवंत खरात हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरनात  तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पो. नि. प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राठोड पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement