Advertisement

 अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच!

प्रजापत्र | Tuesday, 07/05/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन देण्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिलाय. कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. केजरीवाल हे २० मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील.

 

 

सुप्रीम कोर्ट यावेळी सुनावणीदरम्याव म्हटलं होतं की की, 'केजरीवाल हे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार देखील करायचा आहे. ही असामान्य स्थिती आहे. तसेच केजरीवाल हे काही वारंवार अपराध करणारे व्यक्ती नाहीत.' न्यायमूर्ती संजिव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने यासंदर्भात सुनावणी घेतली. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक झाली होती.

 

केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यास ईडीने विरोध दर्शवला होता. यामुळे चुकीचा पायंडा पडेल. तसेच एक सामान्य व्यक्ती आणि एका पदावरील व्यक्तीमध्ये असा भेदभाव करणे योग्य नाही. शेतकऱ्याला शेतात धान्य पेरायचं म्हणून त्याला जामीन मंजूर केला जाईल का, अशा प्रकारचा युक्तीवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला होता.सुप्रीम कोर्टाने यावर म्हटलं होतं की, 'लोकसभा निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात. चार किंवा सहा महिन्यांनी शेतातील पेरणीसारखी ही घटना नाही. ही असामान्य स्थिती आहे. आम्हाला याप्रकरणी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यासाठी प्राधान्याने विचार करावा लागेल.' कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय अडीच वाजेपर्यंत राखून ठेवला होता.केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळण्याची शक्यता होती. पण, तसं होऊ शकलेलं नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आहे. त्यामुळे आपसाठी हा मोठा धक्का आहे.

Advertisement

Advertisement