Advertisement

पोलीस पतीला मारहाण करून वर्दीही फाडली                

प्रजापत्र | Friday, 08/10/2021
बातमी शेअर करा

 बीड-न्यायालयाच्या आवारातील वाहनतळावर पोलीस दांपत्यातील कौटुंबिक वाद उफाळून आला. वाद विकोपाला जाऊन पोलीस पत्नीने पतीला मारहाण करत त्याचा गणवेश फाडला. याप्रकरणी पोलीस पतीच्या तक्रारीवरून पत्नीवर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
            सदरील पोलीस दाम्पत्याचे लग्न सहा वर्षापूर्वी झाले होते. त्यानंतर दोघेही पोलीस पती-पत्नी पेठ बीड येथे राहत होते. दोघात अनेक दिवसापासून वाद सुरु आहे. त्यामुळे घरातून बाहेर काढल्यानंतर सहा महिन्यापासून पती एकटाच राहतो. सध्या पतीची नेमणूक बीडच्या न्यायालयात आहे. गुरुवारी (दि.०७) तो पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना सकाळी ११ वा. न्यायालय आवारातील वाहनतळावर त्याची पत्नी तिथे आली.  तू मला सोडून एकटा कसा राहतो, तू तिसरे लग्न केल्याचे मला समजले आहे असे म्हणत तिने पतीचा गणवेश फाडला. पतीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु पत्नीने तू ड्युटी कशी कारतोस ते बघते म्हणत त्याला मारहाण केली. यावेळी इतर पोलिसांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु पत्नीने काहीही न ऐकता पतीचा मोबाईलही फोडला असे पतीने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पोलीस पत्नीवर कलम ३५३, ३३२, ३४१, ५०४ अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement