Advertisement

घटस्थापनेने योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

प्रजापत्र | Thursday, 07/10/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - महाराष्ट्राचे शक्तीपीठ  व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी ९ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष विपिन पाटील  व सौ.रेणुका विपिन पाटील  यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली.  दरवर्षी भाविकांच्या प्रचंड गर्दीत होणारा हा नवरात्र महोत्सव मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमात  साजरा होत आहे. 

 
७ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत  श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. गुरुवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार विपिन पाटील  व सौ. रेणुका पाटील  यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, विश्वस्त राजकिशोर मोदी,अक्षय मुंदडा, भगवानराव शिंदे,माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम  कुलकर्णी,मंदीराचे मुख्यपुजारी तथा विश्वस्त सारंग पुजारी यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.

सात  महिन्यानंतर उघडले मंदिराचे महाद्वार

तब्बल सात  महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी घटस्थापनेच्या  शुभ मुहूर्तावर भक्तांना श्री.योगेश्वरी देवीचे दर्शन उपलब्ध झाले.गेल्या सात महिन्या पासुन भाविकांना हि दर्शनाची ओढ लागलेली होती.महाराष्ट्राचे शक्तीपीठ व कोकणस्थांची कुलस्वामिनी,अंबाजोगाई चे ग्रामदैवत श्री.योगेश्वरीदेवी चे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासुन बंद राहिल्याने  दर्शन न झाल्याने  अनेकभक्त दर्शनासाठी व्याकुळ झालेले होते.कोरोना च्या साथीमुळे संसर्ग वाढू नये म्हणुन शासनाने अनेक कठोर निर्णय घेतले होते.यात सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. मार्च पासुन बंद झालेली ही मंदिरे कधी भक्तासाठी खुली होतील याची मोठी आस भाविकांना होती. मात्र घटस्थापने च्या मुहूर्तावर अखेर मंदिरे उघडल्याचा आनंद भाविकांमध्ये दिसुन आला. श्री.योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी येतात

मास्क लावला तरच मंदिरात प्रवेश

Advertisement

Advertisement