Advertisement

पिंपळा सज्जाचा तलाठी लाचलुचपतच्या जाळयात

प्रजापत्र | Wednesday, 06/10/2021
बातमी शेअर करा

आष्टी (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळा सज्जाचे तलाठी याने सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार दि.६ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडले.

         पिंपळा येथील सज्जाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे हा सातबारावर पत्नी व नातेवाईकांचे वारस नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने बीड एसीबीकडे केली होती. त्याच वेळी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणीही केली गेली होती. दरम्यान, यानंतर एसीबीने  आष्टी तहसिल कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. तहसिल परिसरात तलाठी नरसाळे याने लाच स्विकारताच एसीबीच्या पथकाने तलाठी नरसाळे यांना गजाआड केले. 
ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ, कर्मचारी श्रीराम गिराम, भरत गारदे, हनुमान गोरे यांच्या पथकाने केली. तलाठी जालिंदर नरसाळे विरोधात आष्टी पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement