Advertisement

नवरात्री,दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन लागले कामाला

प्रजापत्र | Wednesday, 06/10/2021
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी)-नवरात्री आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन विभाग गतीने कामाला लागले असून ग्राहक आणि व्यावसायिकांसाठी काही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यावसायिकांनी अन्न नोंदणी परवाना काढला नसेल तर आजच काढून घ्यावे अन्यथा पदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी दिला. 
                      बीड जिल्ह्यात १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने आणि तसेच कायद्यातील नवीन तरतूदीबाबत बीडमध्ये २ ऑक्टोबर रोजी व्यावसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६ अंतर्गत कलम ३१ नुसार सर्व व्यावसायिकांना परवाना आणि नोंदणी करणे बंधनकारक असून ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी परवाने काढून घ्यावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी केले.सध्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात नवनवीन दुकाने थाटात असून या दुकानांवरून खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करण्यात यावी असे अन्न औषध प्रशासनाने म्हटले आहे.

 

ग्राहकांसाठी या आहेत सूचना 
भगर,शाबूदाना,खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद असल्याची खात्री करून घ्यावी 
वरील पदार्थांवर लेबल व उत्पादकाचे नाव नसल्यास असे पदर्श खरेदी करू नये 
प्रत्येक वस्तूची कालबाह्य दिनांक तपासून घ्यावी 
भगरीचे खुले पीठ बाजारातून विकत घेऊ नये 

 

व्यावसायिकांसाठी सूचना 
कोणत्याही व्यावसायिकांनी अन्न नोंदणी परवाना शिवाय अन्न व्यवसाय करू नये 
प्रत्येक पॅकबंद वस्तूंवर अन्न परवाना अन्न नोंदणी परवाना बंधनकारक राहिलं 
खुली भगर किंवा विना लेबल असलेली वस्तूची बाजारात विक्री करू नये 
मुदतबाह्य वस्तू विक्रीसाठी ठेवू नये 
अन्न व्यवसासायिकांनी भगर उत्पादनाच्या नोंदणी/परवाना शिवाय भगरीचे पीठ स्वतः तयार करून विक्री करू नये. 

 

Advertisement

Advertisement