Advertisement

घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद

प्रजापत्र | Thursday, 02/05/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर -छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मागील काही वर्षांपासून नर्सेस संघटनेची मागणी आहे. तरी देखील समस्या सुटत नसल्याने घाटी हॉस्पिटलमधील नर्सेस संघटनेने आज सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करत निषेध निदर्शने केली.  

 

संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये नवीन कक्ष सुरू केले. मात्र, पद भरती न केल्यामुळे परिचारिकांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्यामुळे निषेध म्हणून परिचारिकांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या एक वर्षापासून आम्ही रुग्णालय प्रशासनाला नवीन कक्ष सुरू न करण्याची विनंती करत आहे. कमी मनुष्यबळ असल्याने मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी मागील काही वर्षांपासून आहे. 

घाटी रुग्णालयातील या समस्यांबाबत नर्सेस संघटनेकडून आणि नर्सेसकडून वारंवार विनंती करण्यात येत आहे. मात्र ती काम केली जात नाही. सोबतच रुग्णांसाठी देखील मोठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आज नर्सेस संघटनेने आपल्या विवीध मागण्यांसाठी २ तास काम बंद आंदोलन केले. यामुळे काही वेळ घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. 

Advertisement

Advertisement