Advertisement

चक्क वाण नदीने बदलले पाञ

प्रजापत्र | Saturday, 02/10/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-अतिवृष्टी तसेच तालुका व परीसरात झालेला प्रचंड पाऊस यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह निर्धारित क्षेत्राबाहेर जाऊन वाण नदीने चक्क आपले नदीपात्रच बदलले.यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे शेकडो शेतकऱ्यांची सुमारे अडीचशे एकर शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर तसेच शंभर टक्के एवढे नुकसान झाले आहे.नुकसानीची तर गणतीच नाही.अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा,विहीरी,बोअर आणि शेतजमीनी या आता फक्त कागदावरच उरल्या आहेत.कारण, वाणनदी पाञाने चक्क शेतजमीन गिळंकृत केली आहे.सुपीक जमीनीवर दगड,गोटे आणि वाळूचा खच साचला आहे. 

 

           शुक्रवारी (दि.१) ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संजय किसनराव भोसले यांच्यासह माजी सरपंच राजेभाऊ देवकते (येल्डा),सरपंच अजित चव्हाण (काळवटी तांडा),एॅड.विलास भोसले,एॅड.दिलीप चामनर,बाबुराव गडदे आदींनी अतिवृष्टी तसेच तालुका व परीसरात झालेला प्रचंड पाऊस यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह निर्धारित क्षेत्राबाहेर जाऊन वाण नदीने चक्क आपले नदीपात्रच बदलल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे शेकडो शेतकऱ्यांची सुमारे अडीचशे एकर शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर तसेच शंभर टक्के एवढे नुकसान झाले आहे.सदरील नुकसानीची तर गणतीच नाही.अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा,विहीरी,बोअर  आणि शेतजमीनी या आता केवळ कागदावरच उरल्या आहेत.कारण,वाणनदी पाञाने चक्क शेतजमीन गिळंकृत केली आहे.सुपीक जमीनीवर दगड,गोटे आणि वाळूचा खच साचला आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जावून चिखल तुडवत,गुडघ्यापर्यंत पाण्यातील सडलेल्या हायब्रिड,सोयाबीन,ऊस या पिकांची पाहणी केली,शेतकऱ्यांचे आश्रू पुसले त्यांना धीर दिला.राज्य सरकार कडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळेस रासपचे संजय भोसले यांनी सांगितले.तसेच पठाण मांडवा येथील शेतकऱ्यांना जमीन सुधारणेसाठी राज्य सरकारने हेक्टरी 5 लाख रूपये मदत करावी अशी मागणी ही राष्ट्रीय समाज पक्षाचे संजय भोसले यांनी केली आहे.निर्धारित क्षेत्राबाहेर जाऊन वाण नदीने चक्क पात्र बदलले आहे.यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील सुमारे दोनशे ते अडीचशे एकर शेतजमीन नदीने गिळंकृत केली आहे.काठावरील शेती वाणनदीच्या पात्रात समाविष्ट झाल्याने अनेक शेतकरी हे भूमिहीन झाले आहेत. 

 

 

मदतीसाठी विविध माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न 
नदीच्या काठावरील शेतक-यांना भरपाई देण्याबाबत सरकारने कायदा करावा,तसेच यावर्षी पाञ बदलून वाण नदीने शंभरहून अधिक शेतक-यांचे दोनशे ते अडीचशे एकरवरील शेती,पीके,विहीरी,बोअर,फळबागा,वृक्ष,विद्युत खांब आदींचे केलेले नुकसान याची गणतीच होऊ शकत नाही.तरी शेतजमीन सुधारणेसाठी प्रत्येक शेतक-याला हेक्टरी पाच लाख रूपये मदत करावी यासाठी आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आ.महादेव  जानकर यांच्या नेतृत्वाखाली विविध माध्यमातून याप्रश्नी शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत.
– संजय भोसले (राष्ट्रीय समाज पक्ष.)

Advertisement

Advertisement