Advertisement

आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का, कोरोना त्रिशतकाच्या उंबर्‍यावर

प्रजापत्र | Sunday, 13/09/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाने आता खर्‍या अर्थाने विक्राळ स्वरुप धारण करायला सुरुवात केली असून बीड जिल्ह्याला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का रविवारी बसला आहे. रविवारी जिल्ह्यात तब्बल 294 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये अंबाजोगाई 42, आष्टी 19, बीड 36, धारुर 26, गेवराई 18, केज 21, माजलगाव 29, परळी 45, पाटोदा 20, शिरुर 12, वडवणी 26 अशा रुग्णांचा समावेश आहे. शिरुर तालुक्यातील बावी तागडगांव, पाटोदा तालुक्यातील सौताडा, परळी तालुक्यातील टोकवाडी, केजमधील नांदूरघाट आदी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली आहे. दुसरीकडे रविवारी 1121 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


 

 

Advertisement

Advertisement