गेवराई दि २८ ( वार्ताहार ) नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल तसेच सन २०१८ च्या शासन नियमानुसार गेवराई शहर वासियांना तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती व इतर लोक गेल्या कित्येक वर्षापासून गायरान कसून आपली उपजिविका भागवतात अश्या लोकांसाठी आता रस्त्यावरची लढाई नाही तर न्यायलयीन लढाई लढावी लागणार असल्याचे मत रिपाइं प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले आहे .गेवराई रिपाइं तसेच कॉंग्रेस सेवादलच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर किशोर कांडेकर , कडूदास कांबळे , राजू जोगदंड , किशन तांगडे , धम्मपाल भोले, ॲड. श्रीनिवास बेदरे , रविंद्र पाटोळे , मनोहर चाळक ,सचिन काकदे , राजू जोगदंड , यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलतांना ते म्हणाले की गेवराई शहररात पीटीआरचा विषय नियमाकुल करण्याचा नसून तो भोगवटदार वर्ग दोन चा विषय आहे शासन परिपत्राकानुसार अतिक्रमण नियमाकुल करण्यास नगरपरिषद उदासीन आहे . तसेच गायरान धारकांसाठी नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल हा चिंताजनक विषय आहे आपण खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टात आव्हान देणार आहोत ही लढाई आता रस्त्यावरची राहिली नाही यांच्या विरोधात आम्ही लढू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यामोर्चामध्ये रिपाइं व कॉंग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते .