Advertisement

पावसाचा कहर

प्रजापत्र | Tuesday, 28/09/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी अजूनही रस्त्यावर पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
केज शहरात प्रवेश करताना पिसाटी नदिवर डॉ. थोरात यांच्या दवाखान्याजवळ असलेला पुल खचला आहे, त्यामुळे केज- अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक युसूफवडगाव मार्गे करण्यात येत आहे. वडवणी - धारुर मार्गावरही काही ठिकाणी पुलावरुन पाणी वाहत आहे. तर तेलगाव- परळी रसत्यावर परळी नजिक पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे.
दुसरीकडे गेवराईत अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. माजलगाव धरणातून ८१ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंदफना आणि गोदावरी तुडूंब भरल्या असुन गोदाकाठच्या २५ हून अधिक गावांचा एका बाजूने तात्पुरता संपर्क तुटला आहे. अंबाजोगाईतिल आपेगावमध्ये सगळीकडे पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात मागच्या काही दशकात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement