Advertisement

राशनसाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन 

प्रजापत्र | Monday, 27/09/2021
बातमी शेअर करा

  अशोक शिंदे

नेकनूर - दि २७ मागच्या सहा महिन्यापासून हक्काच्या राशनसाठी लढा देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर खडकी घाट, तांदळवाडीघाट येथील नागरिकांनी आज खडकी घाट येथील तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे बाळासाहेब मोरे यांनी स्पष्ट करीत या दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला शिव्या घातल्या . विशेष म्हणजे या दुकानदाराचे पंधरा दिवसापूर्वी ग्रामस्थांनी काळ्याबाजारात  जाणारे रात्रीच्यावेळी धान्य पकडले होते मात्र पोलीस आणि महसूल प्रशासन गप्प बसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. 

 

     खडकीघाट आणि तांदळवाडीसाठी असणारे राशन दुकान वादग्रस्त ठरले असून काही महिन्यांपूर्वी या दुकानाचे विरोधात ग्रामस्थांनी चौसाळा रस्त्यावर रौळसगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. पंधरा दिवसापूर्वी या दुकानदाराचे काळ्याबाजारात जाणारे धान्य वाहनासह पकडल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले . प्रशासन राशन देत नसल्याने ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता आज या दोन्ही गावचे ग्रामस्थ बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाण्यात उतरले तर महिला आणि वृद्ध तलावाच्या भोवती बसून होते जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाईल असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

Advertisement

Advertisement