बीड : जिल्हयातील कोरोना संसर्गाचा विळखा सातत्याने वाढत असून शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्हचा आकडा पुन्हा दिडशेपार (156) गेला. यात अंबाजोगाई 15, आष्टी येथील 14, बीड मध्ये 25, धारुर 26, गेवराई 14, केज 10, माजलगाव 16, परळी 24, पाटोदा 4, शिरुर 9 आणि वडवणी 9 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी 742 लोक निगेटिव्ह आले आहेत. तर 101 कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली.
बातमी शेअर करा