बीड : राज्यात सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे, मात्र अनेक ठिकाणी लोक सर्दी, खोकला अशी लक्षणे लपवीत आहेत. त्यावर स्वतःच्या मनाने उपचार घेत आहेत. यामुळे समाजाचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते, त्यामुळे लक्षणे लपवू नका, कोरोना झाला तरी घाबरू नका. कोरोना बरा होतो , वेळेत उपचार घ्या असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
https://youtu.be/k6IDnxqlHy4
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जनतेला एका चित्रफितीच्या माध्यमातून आवाहन केले असून त्यात कोरोना गंभीर असला तरी वेळेत उपचार घेतल्यास बरा होतो, त्यामुळे लोकांनी लक्षणे लपवू नयेत, स्वतः मनाने मेडिकलवर जाऊन औषधे घेऊ नयेत. लक्षणे उद्भवत असतील तर तपासणी करून घायवी आणि त्यानुसार उपचार घ्यावेत. कोरोनाला घाबरू नका, मात्र सावधगिरी आणि सुरक्षा महत्वाची आहे असे आवण केले आहे.