धारूर - इतरांचे जीव वाचवण्यासाठी रात्री बेरात्री 108 रुग्णवाहिका घेऊन धावणाऱ्या पायलट चाच मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
खोलेश्वर बाबुराव निर्मळ (38) असे पायलट चे नाव असून ते धारूर जि. बीड येथे 108 रुग्णवाहिका पायलट म्हणून कार्यरत होते. धारूर येथील सरकारी दवाखाना परिसरातील सरकारी निवासस्थानी ते राहत होते. एका पायलट ची ड्युटी संपल्यानंतर गाडीची चावी देण्यासाठी ते निर्मळ यांच्याकडे गेले असता सदरील घटना उघडकीस आली.
दरम्यान ते त्यांच्या कुटुंबियांसंवेत तेथे राहत होते. परंतु रात्री घरी कुणी नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
बातमी शेअर करा