बीड दि.२४ – आज दिनांक 24/09/2021 रोजी बीड येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपी अब्दुल रहमान ऊर्फ एरार नवाब हाश्मी यास पाच वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे.
बीड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने दि. 11/05/2018 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे फिर्याद दिली होती.त्यामध्ये आरोपी अब्दुल रहमान ऊर्फ एरार याने सकाळी लाईफ लाईन हॉस्पीटल जवळ तिचा विनयभंग करून तिस मारहान केली असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलीस ठाणे शिवाजीनगर अंतर्गत गु.र.नं.304/2018 कलम 354, 323 भादंवि सह कलम 12 बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक आर. पी. कोलते यांनी करून तपासाअंती अंतीम दोषारोप पत्र मा. न्यायालयास सादर केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासीक अधिकारी यांनी केलेल्या भक्कम तपासाच्या अधारावर व ऍड. मंजूषा दराडे यांनी केलेल्या युक्तीवादाच्या जोरावर मा. न्यायालयाने आरोपीस कलम 323 भादंवि आणि कलम 7 व 8 बालकांचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधिनीयम अंतर्गत दोषसिध्द ठरवले आहे. मा. न्यायालयाने आरोपीस कलम 7 व 8 पोक्सो मध्ये पाच वर्ष सश्रम कारावास आणि 2000/- रु. दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम 323 भादंवि मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि 1000/- रु. दंड, दंड न भरल्यास 15 दिवस अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीस दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या आहेत.
सदर प्रकरणात पैरवीचे कामकाज सफौ सी. एस. इंगळे व मपोना सी. एस. नागरगोजे यांनी पाहिले.
प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा