बीड :- केज तालुक्यातील मांजरा धरणाचे १८ पैकी १२ दरवाजे उघडले गुरुवार (दि . २३) रोजी रात्री झालेल्या पाऊसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली .
लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा आधार असलेल्या मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले. काल रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. दोन दिवसापूर्वी मांजरा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते, मात्र आता १२ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मांजरा धरण निर्मितीपासून १२ दरवाजे उघडण्याची वेळ ही फार दुर्मिळ असते.
बातमी शेअर करा