अशोक शिंदे
नेकनूर दि.19-नितीची कुऱ्हाड हातात घेऊन भक्तांची संकटे निवारण करण्याचं काम गणपती बाप्पा करतो तो कोरोनाच संकट लवकरच निवारण करेल असे प्रतिपादन युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी केले ते नेकनूर येथे रौद्रशँभु तरुण गणेश मित्र मंडळ नन्नवरे वस्ती येथे आयोजित एक दिवसीय कीर्तन महोत्सवात बोलत होते.या किर्तनास प्रमुख उपस्थिती नाना महाराज कदम,जिल्हा परिषद सदस्य भारत काळे, शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज कोठुळे, गणेश महाराज वारांगे,अप्पा महाराज कोठुळे,श्री.संतोष महाराज वणवे ,प्रा सुरेश महाराज जाधव, गोरख कदम मांडवखेल ,पीएस आय विलास जाधव,
नानासाहेब घल्लाळ यांच्या सह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते या कीर्तनाचे सौजन्य कालिका अर्बन बँकेचे चेअरमन चिंतामण कदम यांनी केले होते.
नेकनूर येथील नन्नवरे वस्तीवर रौद्रशंभू गणेश मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे माऊली यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.यावेळी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या धरोनीया फर्ष करी !भक्तांची विघ्ने निवारी ।ऐसा गजानन महाराजा! त्याचे चरणी नमस्कार माझा। शेंदुर शमी बहु प्रिय ज्याला ! तुरा दुर्वांचा शाेभला ।उंदीर असे जयाचे वाहन !माथा रत्नजडीत मुकूट पूर्ण ।नाग यज्ञाेपवीत रुळे ! शुभ्र वस्त्र शोभती साजीरे। भाव मोदक हराभरी ! भावे तुका पुजा करी॥ या अभंगावर चिंतन मांडले अभंगाचे निरुपण करताना महाराज म्हणाले की नीती शिकवन्याचे काम वारकरी संप्रदायाचे आहे. गुन्हा घडू नये म्हणून वारकरी विचार महत्वाचे आहेत. संतांना शोभून दिसायचे असेल तर शास्त्र आणि देवाला शोभून दिसण्यासाठी शस्त्र महत्वाचे आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे तिच्याकडे नीती चिकू रोड हातामध्ये आहे त्याद्वारे भक्तजन वरती येणारी संकटे निवारण करण्याचे काम गणपती बाप्पा करतो शेंदूर आणि शमी वृक्ष त्याला प्रिय आहे तर दुर्वाचा तुरा वाहिला जातो तसेच उंदीर हे वाहन असून रत्नागिरीत मुकुट असं त्याला स्वरूप आहे अशा गणरायाच तुकोबराय पूजन करतात म्हणून संतांनी सर्वच ठिकाणी गणेशाचे सर्वप्रथम पूजन केलेले आहे
कोरोणाच्या संकटामुळे माणुसकी हरवत असताना आता हळूहळू गणेश बाप्पाच्या कृपेने पूर्ण कमी होत आहे गणपतीबाप्पाला विनंती आहे की सगळे संकट त्या निवारण करावे, लहान मुलांना नीती आणि संस्कार शिकवले पाहिजेत तसेच कौटुंबिक कलर बाजूला सारून एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब केला पाहिजे तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून उच्चपदस्थ झाले पाहिजे व्यसन मुक्ती अंधश्रद्धा यासंदर्भात ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी कीर्तनातून प्रबोधन केले या कीर्तनाला साथ संगत संगीतरत्न अभिमान महाराज ढाकणे
संगीत आलंकार ओमकार महाराज जगताप ,ओंकार महाराज कागदे,अनिल महाराज कासकर
पालवे महाराज.. योगेश महाराज जोगदंड यांची लाभली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रौद्रशंभु तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी शुभम नन्नवरे,अशोक नन्नवरे,अनुज नन्नवरे,विष्णू ,चंदू नन्नवरे नन्नवरे,रोहन नन्नवरे ,हरीओम नन्नवरे,नंदू नन्नवरे,गोरख कानडे, श्रीकृष्ण कानडे,उमेश माखले,संभाजी नन्नवरे यांनी प्रयत्न केले.