Advertisement

धारुर घाटात पुन्हा दरीत कोसळला ट्रक

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-धारूर घाटात शनिवारी सकाळी सोलापूर कडून सिंमेट घेऊन जाणारे ट्रक (क्र.एमएच.१२एन.एक्स.४०९०) हा कठडा तोडून दिडशे ते दोनशे मीटर दरीत कोसळल्याची दुर्घटना  घडली. यात चालकाचा जागीच मृत्यु झाला.  
             राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सीवरील धारूर तेलगाव रस्त्यावर अवघड घाट  आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र.एम.एच.१२ एन.एक्स.४०९०  हा सकाळी साडेनऊच्या दरम्यान अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मीटर खोल कोसळला.या अपघातात गाडीचा चालक पैंगबर पटेल हा जागीच ठार झाला. धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. या चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापुर्वीच चालकाचा मृत्यु झाला होता. धारूर घाटात  नेहमीच घडणाऱ्या अपघातामुळे वाहनधारकात भिती निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement