Advertisement

पालकमंत्र्यांच्या आश्वासनंतर नेकनूरकरांचे आंदोलन मागे

प्रजापत्र | Friday, 17/09/2021
बातमी शेअर करा

अशोक शिंदे 
नेकनूर दि.१७-नेकनूरमधील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी आणि रखडलेल्या राज्य महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेकनुरकरांनी आंदोलन सुरु केल्यानंतर त्या आंदोलनकर्त्यांची अखेर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.नेकनूरच्या आठवडी बाजार सुरु करण्यासाठी आणि एच पीएम च्या भोंगळ कारभाराबाबत रास्तारोकोही करण्यात आला होता. 
                   बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार नेकनूरमध्ये भरतो.कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी आणि सर्वसामन्यांचे अर्थकारण बिघडले होते.या आठवडी बाजारातून लाखोंची उलाढाल होत असे.मात्र बाजार बंद असल्याने ही उलाढाल बंद झाली असून यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली.राज्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना आठवडी बाजारच निर्बंधात का ? असा सवाल उपस्थित करत १२ सप्टेंबरला गणेश ढवळे,जितेंद्र शिंदे  यांच्या नेतृवाखाली नेकनुरकरांनी रास्तारोको केला होता.यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी जितेंद्र शिंदे, ऋषिकेश सुरवसे,संतोष शिंदे,अजय निर्मल,सय्यद जाहेद जमील,विलास राऊत,शेख अर्शमिद आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.अखेर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत आठवडी बाजारावरील निर्बंध हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात असल्याचे सांगितले. 

 

एचपीएमच्या मग्रुरीपणाला चाप लावा
मागचा चार-पाच वर्षात नेकनुरकरांना एचपीएमच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसला आहे.या कंपनीच्या मग्रुरीपणामुळे अनेकांना जीव ही गमवावा लागला असून कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात व्यापाऱ्यांवर निर्बंध असल्याने मोठे नुकसान झाले होते.नंतर या कंपनीने ठिकठिकाणी रस्ते उकरून ठेवत काम वर्षभर तसेच प्रलंबित ठेवल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली असून एचपीएम कंपनीचा परवाना रद्द करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. 

 

Advertisement

Advertisement