बीड : मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे पाठविताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मराठा समाजासाठी हा काळा दिवस असून ठाकरे , चव्हाण यांच्या सरकारने हा काळा दिवस आणला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची या सरकारची इच्छाच नव्हती, या सरकारच्या मनातच हे आरक्षण नव्हते, म्हणूनच ही वेळ आली आहे. या सरकारला मराठा समाजाच्या हिटाची थोडी जरी चिंता असेल तर आरक्षण टिकविण्यासाठी तातडीने अध्यादेश काढावा किंवा विधी मंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलावून त्यात निर्णय घ्यावा अन्यथा जनता या सरकारला माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?
http://prajapatra.com/308
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आ. मेटे यांनी ही प्रतिक्रिया दिली. यापूर्वीही सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला होता.