Advertisement

समाजसेविकेस मागितली खंडणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रजापत्र | Wednesday, 08/09/2021
बातमी शेअर करा

केज दि.८ - एका समाजसेविकेची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून तिघांनी तुझ्या संस्थेचा हिशोब दे नसता दोन लाख रुपये दे अशी खंडणीची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज - मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव पाटीजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 केज येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र या संस्थेच्या सचिव तथा समाज सेविका मनीषा सीताराम घुले ( वय ४१ ) या ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.१५ वाजेच्या केज - मांजरसुंबा रस्त्याने जात असताना कोरेगाव पाटीजवळ श्रीराम तुकाराम तांदळे ( रा. कोरेगाव ता. केज ) व इतर दोघांनी त्यांची गाडी अडविली. श्रीराम तांदळे याने चाकूचा धाक दाखवून 'तु मला कोर्टातून नोटीस का पाठवलीस' व अर्वाच्य भाषेत बोलून शिवीगाळ केली. त्यांनी मनीषा घुले यांना 'तुझ्या संस्थेचा हिशोब दे, नाही तर मला दोन लाख रुपये दे अशी खंडणी मागितली.  त्यावेळी त्यांना शिवागाळ करु नका, संस्था काय माझ्या एकट्याची नाही असे त्या म्हणाल्या असता त्यांनी त्यांना व त्यांच्या सोबतच्या साक्षीदारास शिवीगाळ करून तुम्ही जर दोन लाख रुपये दिले नाहीत, तर जिवे मारुन टाकीन अशी धमकी ही दिली. अशी फिर्याद मनीषा घुले यांनी दिल्यावरून श्रीराम तांदळे याच्यासह इतर दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement