Advertisement

कोरोनानंतर वाढले गोल्ड लोणचे प्रमाण

प्रजापत्र | Sunday, 05/09/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.५ (प्रतिनिधी)-कोरोनाने सामान्यांचे सारेच अर्धचक्र उध्वस्त केले असून अनेकांचा रोजगार गेला आहे. रोजी रोटीचे वांदे झाल्याने घरातले किडूक-मिडूक गहाण ठेवून जीवन जगण्याची वेळ अनेकांवर आली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बँका, फायनान्स कंपन्यांकडे गोल्ड लोणचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.तर आणि खासगी सावकारांकडेही सोने गहाण टाकून कर्ज घेण्यासाठी मोठा ओघ असल्याचे चित्र आहे.

 

कोरोनामुळे देशभरातच सामान्यांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अनेकांचे उद्योग-व्यवसायही बंद झाले आहेत देशाच्या पातळीवर बेरोजगारीचा दर आठ टक्के पेक्षा अधिक झाला असून मागच्या दहा वर्षात बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे रोजगार बुडाल्यामुळे अनेक कुटुंबासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातूनच घरात साठविलेले सोने नाणे बाहेर काढून त्यावर गुजराण करण्याची वेळ अनेक कुटुंबावर आली आहे.

बँका आणि फायनान्स कंपनीमध्ये मागच्या चार महिन्यात गोड लोणचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे नाव न छापण्याच्या अटीवर एका फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या चार महिन्यात पाच वर्षात झाली नाही देत की गोल्ड लोणचे प्रकरणे झाली आहे. असाच ओघ राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडे देखील वाढलेला आहे. बँका आणि फायनान्स कंपन्या सोबतच खाजगी सावकाराकडे सोने गहाण टाकून तात्पुरती नड भागविणाऱ्यांची  संख्या देखील मोठी आहे. ज्यांच्याकडे सोन्याची पावती नाही, किंवा हॉलमार्क च्या नियमांचे बसत नाहीत त्यांना खाजगी सावकाराकडे गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मागच्या चार पाच महिन्यात अचानक गोड लॉन वरच अनेक लोक भर देत असल्याचे चित्र आहे. बुडालेला रोजगार व्यवसायात येत असलेल्या अडचणी यामुळे आजचा दिवस भागला पाहिजे या हेतूने लोक घरातील सोने बाहेर काढत आहेत. जे सोने पोरी बाईंच्या लग्नासाठी ठेवले होते ते आता आजची गरज भागविण्यासाठी बाहेर काढावे लागत असल्याची दुःखाची छटा अनेक कुटुंबावर आहे.

 

 

Advertisement

Advertisement