नेकनूर दि.५-चालते-बोलते मुलं सांभाळताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते परंतु न बोलणारे आणि काहीच ऐकू न येणारे असे अस्थिव्यंग व मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षण देणे हे काम जिकिरीचे आहे परंतु नेकनूर येथील परिवर्तन संस्थेमार्फत सुरू असलेल्या विद्यालयात अशी विद्यार्थी घडविणे त्यांना शिक्षणच नव्हे तर विविध क्षेत्रात ज्ञान देऊन घडविण्याचे काम सुरू असून त्यातीलच काही विद्यार्थी शिक्षणात, खेळांच्या स्पर्धेत आपले व आपल्या संस्थेचे नाव देश पातळीवर झळकवित असल्याने येथील अस्थिव्यंग निवासी विद्यालय व मूकबधिर निवासी शाळा ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच माहेरघर ठरत आहे.
परिवर्तन सेवाभावी संस्था नेकनूर या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दुर्गम शेत्रातील अपंग मूकबधिर दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासाची व पालन-पोषण जबाबदारी परिवर्तन सेवाभावी संस्था प्रामुख्याने पेलावत आहे . या संस्थेच्या दोन प्रमुख शाळा आहेत त्यामध्ये मूकबधिर निवासी शाळा नेकनूर व अस्तिव्यंग निवासी विद्यालय नेकनूर या दोन्हीही शाळेची मुहूर्तमेढ स्वर्गीय वसंतरावजी खडके गुरुजी त्यांच्या प्रयत्नांमधून दिव्यांग क्षेत्राविषयी असलेल्या आत्मीयतेणे रोवली गेली त्यांच्या अखंड आदर्श सेवेमधून अण्णांनी विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडवले ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांना सुद्धा इतर सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने स्वर्गीय अण्णांनी 2006 झाली मूकबधिर शाळेची पायाभरणी केली. अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी 2008 ला हक्काचे घर उभारले. मूकबधिर व अस्तिव्यंग विद्यार्थ्यांविषयी पालकांचा समाजांचा दृष्टिकोन बदलविणे आणि शिक्षणाची उद्दिष्टे दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि दिव्यांग विद्यार्थी सक्षम व स्वावलंबी बनविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
दोन्ही शाळेच्या सानिध्यातुन शारीरिक अपंगत्व घेऊनच जन्माला आलेल्या अनेक मुलामुलींची आरोग्यसेवा अपंगाची साधने त्यात अस्थिव्यंग निवासी विद्यालय नेकनुर या शाळेच्या माध्यमातून व्हीलचेअर , कुबड्या , ट्रायसीकल, जयपुरीफूट , कॅलिपर्स, फिजिओथेरपी सेवा , व मूकबधिर शाळेच्या माध्यमातून श्रवण तपासणी श्रवण यंत्र, स्पीच ट्रेनरच्या सहाय्याने स्वीय थेरेपी सेवा , शीघ्र निदान व उपचार केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार्या पालक मार्गदर्शन व समुपदेशनातून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रसंगी आवश्यक असणार्या शस्त्रक्रिया यासाठी पाठपुरावा करून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी च्या आवश्यक असणारी सक्षमता प्राधान्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे
शाळेच्या उपक्रमशील शिक्षक आणि शिक्षिका यांच्या अपार मेहनतीच्या प्रयत्नातून मार्च 2006 साली झारखंड (जमशेदपुर) याठिकाणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून शाळेचे नाव देशपातळीवर झळकवले, इतकेच नव्हे तर मागील सहा वर्षापासून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यांचे संगीत विजेतेपद खेचून आणण्यात अस्थिव्यंग शाळेला तर सन 2014 जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे सांघिक विजेतेपद मूकबधिर निवासी शाळेने मिळवले आहे. राज्यपातळीवर आत्तापर्यंत साधारणता अस्थिव्यंग शाळेने 20 सुवर्ण पदक तर मूकबधिर शाळेने आठ सुवर्णपदके मिळवण्यात यश प्राप्त झाले आहे मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय वाचा स्पर्धेमध्ये ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये संगणक कार्ड बनविणे खडू बनविणे , मेणबत्ती बनविणे , मातीकाम हस्तकला,आदी प्रकारचे ज्ञान देऊन सुप्त कला गुणांना देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला जात आहे. शाळेची प्रशस्त इमारत, वस्तीगृह, संस्कृतीक हॉल विविध कलागुणांना आणि खेळांना जोपासण्यासाठी तर एक रंगमंच साठी अद्यावत वर्गखोल्या उपलब्ध आहेत. वर्षातून दोन वेळा पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते त्यामध्ये पालकांचे समुपदेशक केले जाते. व दिव्यांग क्षेत्राविषयी माहिती दिली जाते वर्षभरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन, शैक्षणिक सहल, शिबिरे, विविध कार्यशाळा, लोकसहभाग यांच्या योजना संस्थेमार्फत केल्या जातात. स्वर्गीय खारके अण्णांचा प्रेरणेतून सुरू झालेल्या या शैक्षणिक प्रवाहाला संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण खारके , सचिव नंदकिशोर कांकर अस्थिव्यंग शाळेचे मुख्याध्यापक भोंडवे सर व मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक लुचारे सर व शाळेतील विविध उपक्रम राबविणारे शिक्षक शिक्षिका यांच्या उत्तम नियोजनातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सतत अग्रेसर भूमिका घेऊन त्यांना घडविण्याचा प्रयत्न संस्था आणि कर्मचारी करत आहे.