Advertisement

केवायसीच्या नावाखाली निवृत्त प्राचार्यासह दोघांची ऑनलाईन फसवणूक

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

बीड दि.२९ (प्रतिनिधी)- ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत दोघांच्या बँक खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन मोबाईल क्रमांकासह अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एका सेवानिवृत्त प्राचार्याची फसवणूक झाली आहे.

 

हेही वाचा... बाजार समितीमार्फत होणार रेशीम कोष खरेदी  http://prajapatra.com/2996

 

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील ऐश्वर्या आजिनाथ हाडोळे यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. ऑनलाईन केवायसी करा असे म्हणून त्यांच्या बँक अकाउंट मधून २० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी हाडूळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर शहरातील चाणक्यपुरी भागातील सेवानिवृत्त प्राचार्य अरुण नीळकंठ भस्मे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मोबाइल क्रमांकावरून राहुल नावाच्या व्यक्तीने फोन करून ऑनलाईन केवायची करा असे म्हणून अकाऊंटवरून ६० हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी अरुण भस्मे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. नि. ठोंबरे करीत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. केवायसीच्या नावाखाली सर्रास फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे व कोणत्याही प्रकारच्या लिंकवर किंवा फोनवर आपली माहिती देऊ नये असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement