Advertisement

 बाजार समितीमार्फत होणार रेशीम कोष खरेदी 

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड-जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या बाबत शनिवारी (दि.२८) शेतकऱ्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या,बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खरेदी विक्रीसाठी व्यवस्था करावी अशी मागणी केली.तेव्हा पुढील महिन्यातच बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष साठी स्वतंत्र शेड उभारून लिलाव प्रक्रिया द्वारे राम नगर मार्केटच्या धर्तीवर कोष खरेदी विक्रीची व्यवस्था करू असे  रेशीम संचालनालय संचालक श्रीमती बानायत यांनी म्हटले आहे. बीडमध्येच रेशीम कोष खरेदीविक्रीसाठी सुविधा मिळणार असल्याने या शेतकऱ्यांनी  समाधान व्यक्त केले. 

 

बीड जिल्ह्यातील रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्ये बाबत वारंवार पत्र व्यवहार करुनही संबंधीत कर्मचारी व प्रशासन जाणिक पुर्वक दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मागील वर्षीच्या महारेशीअम अभियानांच्या माध्यमातुन रेशीम ऑफीस व संचनालय मनरेगाच्या योजनेतुन मिळणारे अनुदान व रेशीम कोषांच्या उत्पादनातुन मिळणारे उत्पन्न ह्याचे महत्व पटवून देत नवीन शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे वळवले. पण ते करत असताना शेतकऱ्यांना पायाभुत सुविधा म्हणजेच अनुदान, तांत्रीक मार्गदर्शन व शासनाचे नवीन येणारे उपक्रम योजना या सर्वांचे समाधानकारक कोणतेही काम ऑफीस व संचनालय करुन शकले नाही.मागील वर्षापासुन २०१९ ते २०२१ या कालावधीत मध्ये कोरोना महामारीमुळे या काळात रेशीम कोषांचे दर खुप कमी झाल्याने रेशीम शेती खुप मोठी आर्थीक अडचणी मध्ये सापडली होती, त्यामुळे शतेकरी फार मोठया अडचणीत असताना त्या अडचणीतुन त्याला थोड्या फार प्रमाणात मदत होईल अशी शासनाकडे ५० रु. प्रति केलो प्रोत्साहन योजना आहे.

 

तरी महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयामार्फत ही योजना राबवुन तेथील रेशीम शेतकऱ्यांना मदत करण्यात आली उदा.जिल्हा रेशीम कार्यालय यवतमाळ व असे इतर काही जिल्हयातील शेतकऱ्यांना हया योजनेचा फायदा झालेला असताना बीड जिल्हयातील एकाही शेतकऱ्यास जिल्हा रेशीम कार्यालय बीड मार्फत ह्या योजनेचा फायदा झालेला नाही. बीड जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्याची कोष विक्री करण्यासाठी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदीची व्यवस्था करण्यात अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती याबाबत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन बाजार समिती मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या त्यामुळे येत्या काही दिवसातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement