Advertisement

नगर पालिकेकडून ना धूर फवारणी, ना नालेसफाई, आरोग्य विभागही सुस्त

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड : बीड जिल्ह्यात सारी आरोग्य यंत्रणा अजूनही कोरोनाच्याच नियंत्रणात मग्न असतानाच संपूर्ण जिल्ह्यात कमी अधिक फरकाने घराघरात सर्दी तापीचे रुग्ण आढळून येत आहेत. मागच्या पंधरवड्यात जिल्ह्यात डासांचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले असले तरी कोणत्याही नगरपालिकेकडून किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून धूर फवारणी, नाले सफाई  याकडे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे साथ रोगांचे प्रमाण वाढत असून सारा जिल्हाच आजारी पडल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था  आणि आरोग्य विभागाला कमला लावण्याची आवश्यकता आहे.

 

बीड जिल्ह्याला कोरोनाचा असलेला विळखा जरा कुठे सैलावत असतानाच आता सर्दी तापीच्या साथ रोगांनी जिल्ह्याला ग्रासले आहे. घराघरात तापीचे रुग्ण असल्याचे चित्र आहे. सर्दी, टॅप, अशक्तपणा अशी लसखाने असलेले रुग्ण मोठ्याप्रमाणावर दिसत असल्याने नागरिक वैतागले आहेत. डासांचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले असतानाच डास  निर्मूलनासाठी कोणत्याच उपाययोजना प्रशासकीय पातळीवर होत नसल्याचे चित्र आहे. नाले सफाई, उघड्या गटारींची स्वच्छता, पाणी साठ्यांच्या ठिकाणी दास निर्मूलनाच्या उपाययोजना याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून ते मोठ्या लहान गावांपर्यंत कोठेच धूर फवारणी किंवा इतर उपाययोजना  होत असताना दिसत नाहीत. त्यामुळे देखील रोज हजारो नवे रुग्ण टपणे फणफणताना दिसत आहेत.

 

 

दोन महिन्यांपूर्वीच दिला होता इशारा
दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान मलेरिया, डेंग्यू आदींच्या डासांची पैदास होत असते. या डासांच्या पैदाशीच्या काळात सर्वत्र डास निर्मूलन उपाययोजना हाती घेणे आवश्यक असते. कोरोनाच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असा इशारा दोन महिन्यापूर्वीच राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य प्रशासनाला दिला होता. मात्र आरोग्य विभागाचे हे पत्र स्थानिक यंत्रणेने फारसे गांभीर्याने घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. यावर्षी डासांची पैदास वाढून सर्दी तापीचे रुग्ण वाढतील असा धोका वर्तविण्यात आल्यानंतरही त्याकडे पुरेसे लसख दिले गेले नाही, त्याचा परिणाम आता जिल्ह्याला भोगावा लागत आहे.

 

 

Advertisement

Advertisement