Advertisement

रक्तदात्यांअभावी रक्तपेढ्या अडचणीत

प्रजापत्र | Saturday, 28/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

अंबाजोगाई - कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे व दैनंदिन शस्त्रक्रिया मुळे  रक्तपेढीत दररोज २० ते २५ बॅग ची मागणी होते.या शिवाय  प्लेटलेट्सची मागणी ही वाढली आहे.  मात्र बॅगचिच कमतरता जाणवत  असल्याने प्लेटलेट्स द्यायच्या कशा? असा प्रश्न रुग्णालय प्रशासना समोर निर्माण झाला आहे.

 

 

अंबाजोगाई तालुक्यात व परिसरातील विविध तालुक्यातील रुग्ण अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी येतात. सध्या विविध ठिकाणी डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळुन येत आहेत. या आजारावर अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. डेंग्यूच्या गंभीर रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका असतो. जेव्हा प्लेटलेट्स काऊंट १५ हजार प्रती मायक्रोलिटरपेक्षा खाली येतात तेव्हा त्याला 'लो प्लेटलेट्स'मानले जाते. अशावेळी रुग्णाला रँडम डोनर प्लेटलेट्स' (आरडीपी) किंवा 'सिंगल डोनर प्लेटलेट्स' (एसडीपी) दिले जाते. परंतु, कोरोनामुळे रक्तदानाची मोहीम थंडावल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवु लागला आहे. परिणामी प्लेटलेट्स साठी सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना लातुर येथील खाजगी रक्तपेढी मधुन चढ्या दरात  पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स आणण्याची वेळ आली आहे.

 

 

ट्रिपल बॅगच्या मागणीत वाढ

एका रक्तदात्याचा रक्तातून लाल पेशी, प्लेटलेट्स', 'प्लाइमा अशा तीन घटकांना वेगळे करता. येते. यासाठी ट्रिपल बॅगची गरज पडते. सूत्रानूसार, कोरोनामुळे या बॅगच्या उत्पादनावर प्रभाव पडला आहे. कोरोना कमी होताच रक्त व रक्तघटकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठादारांकडून कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

 

 

मागणी प्रमाणे पुरवठा बंद
स्वाराती शासकीय रुग्णालयांच्या रकपेढीत कोरोनापूर्वी रक्तदात्यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत नव्हता.सातत्याने रक्तदान शिबीर सुरूच असत.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लसीकरण यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे.रक्तपेढी च्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी जनजागृती सुरू आहे.रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले तर निश्चितच तुटवडा कमी होऊन गरजु रुग्णांना रक्तपुरवठा होईल.
- डॉ.शिला गायकवाड, रक्तपेढी, अंबाजोगाई.

 

 

 

Advertisement

Advertisement