Advertisement

जिल्ह्याबाहेरील समिती करणार अवैध वाळूच्या तक्रारींचा निपटारा

प्रजापत्र | Tuesday, 24/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड : औरंगाबाद विभागात गौण खनिजाच्या अवैध उपसा आणि इतर तक्रारींची संख्या सातत्याने वाढत असून आता यावर जिल्ह्याबाहेरील पथकांकडून नियंत्रण ठेवण्याचा नाव फंडा समोर आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी गौणखनिजांच्या तक्रारींवर लक्ष ठेवून त्यांचा निपटारा आणि नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पथक गठीत केले आहे. यात विभागीय आयुक्तालयातील अधिकारी पथक प्रमुख असून बाहेरच्या जिल्ह्यातील खनिकर्म अधिकारी सदस्य सचिव आहेत. बीडच्या पथकाची जबाबदारी अपार आयुक्त अविनाश पाठक यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

 

 

औरंगाबाद विभागात वाळूचा आणि गौण खनिजांचा अवैध उपसा आणि वाहतूक कळीचा मुद्दा आहे. वाळूच्या अवैध उपसा आणि वाहतुकीच्या मोठ्याप्रमाणावर तक्रारी सातत्याने येत आहेत. विशेषतः महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधातही मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी आता विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी विशेष दक्षता पथकांची स्थापना  केली आहे. या पथकात एक  आयुक्तालयातील अधिकारी, दोन त्या जिल्ह्यातील अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून इतर जिल्ह्यातील खनिकर्म अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील वाळू आणि इतर गौणखनिजांच्या तक्रारींवर सदर पथक लक्ष ठेवणार आहे.
बीडच्या पथकाची सूत्रे अपार आयुक्त अविनाश पाठक यांच्याकडे देण्यात आली आहेत. पाठक यांनी यापूर्वी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी आणि अपार जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पहिले आहे. तर सध्या त्यांच्याकडे बीडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाच्या प्रमुख पदाची सूत्रे आहेत.

असे आहे पथक
अविनाश पाठक ( अपर आयुक्त , अध्यक्ष ), भारती सगरे (उपजिल्हाधिकारी , सदस्य ) , अधीक्षक भूमिअभिलेख (सदस्य ) , जिल्हा खनिकर्म अधिकारी लातूर (सदस्य सचिव )

 

 

हेही वाचा... 
नारायण राणेंना अटक होणार?
http://prajapatra.com/2948

 

Advertisement

Advertisement