Advertisement

गणेश विसर्जनासाठी भक्तांना परवानगी नाही;नगरपालिका करणार बाप्पांचे विसर्जन

प्रजापत्र | Friday, 28/08/2020
बातमी शेअर करा

बीड दि.२८ (प्रतिनिधी)-यंदा गणेश विर्सजन १ सप्टेंबरला असून भक्तांना विसर्जनासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली आहे.त्यामुळे आता बाप्पांच्या विसर्जनाची जबाबदारी नगरपालिकेवर असून बीड शहरातील प्रत्येक प्रभागातून गणपतींच्या मूर्तीचे संकलन करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 
                        जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांना काही अटी आणि शर्थी लादत गणपती बसविण्यास परवानगी दिली होती.तसेच घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमनही झाले आहे.आता विसर्जनाला तीन दिवस उरले असून शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जनासंदर्भात एक आदेश काढत विसर्जन मिरवणुकीसाठी भक्तांना परवानगी नाकारली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत शारीरिक अंतराचे पालन होणे कठीण असल्याचे सांगत हा आदेश काढण्यात आला. तसेच विसर्जनाची जबाबदारी नगरपालिकेवर सोपविण्यात आली आहे.नगरपालिकेचे कर्मचारी प्रभागानुसार नियुक्त करण्यात आले असून
राजीव गांधी,भक्ती कन्स्ट्रक्शन चौक,सम्राट चौक,मारुती मंदिर (शाहूनगर), अंबिका चौक,सिंहगड लॉन्स (कॅनॉल रोड) या ठिकाणी रूपकांत जोगदंड (मो-९२७२९१९१९३) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.तर शिवराज पान सेंटर,मारुती शोरूम जवळ (बार्शी रोड),जुना नगर नाका,ग्रामसेवक कॉलनीसमोर (नगर रोड),तुळजाई चौक,राजयोग मंगल कार्यालय समोर (धानोरा रोड) येथील जबाबदारी भागवत जाधव (मो-९७६७४८९३८८) यांच्याकडे असेल.तसेच महात्मा फुले पुतळा (सिद्धिविनायक),माळीवेस चौक,जिजामाता चौक,कबाड गल्लीसाठी महादेव गायकवाड (मो-८४४६७६७६१५) हे असतील.तर कारंजा टॉवर,बलभीम चौक,जुनी भगवान विद्यालय,चंपावती नगर (म्हसोबा मंदिरा जवळ), संत भगवान बाबा प्रतिष्ठान कमान,सह्यादी हॉटेलजवळ  प्रशांत ओव्हाळ (मो-७०२०५४३६५४) हे असणार आहेत.तसेच रामतीर्थ,हिरालाल चौक,काळा हनुमान ठाणा,शनिमंदिर गल्ली (मारोती मंदिर),नाळवंडी नाका,लोणार पुरासाठी भारत चांदणे (मो-९१३०९१८६२८) यांना नियुक्त करण्यात आले आहे.खडकपूरा पोस्ट ऑफिस,बार्शी नाका राजू वंजारेकडे (मो-९३७०७६७४७६) असणार आहे.दरम्यान नागरिकांनी वरील ठरवून दिलेल्या जागीच गणपतींच्या मुर्त्या द्याव्यात असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर व मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी केले आहे.   
 

Advertisement

Advertisement