Advertisement

 अठरा वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 18/08/2021
बातमी शेअर करा

  वडवणी- तालुक्यातील मामला येथील अठरा वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातली लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  काल दि.१७ रोजी सकाळी बारा वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली मयत तरुणाचे नाव अभिषेक रघुनाथ लंगे वय (१८ वर्ष) वडिलांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया वडवणी शाखेचे एक लाख रुपयांचे कर्ज असल्याचे समजते वन टाईम सेटलमेंट मध्ये मयताच्या वडिलांचे नाव आले होते दहा हजार रुपये भरूनही ते माफ  झाले नव्हते तसेच वडील व भाऊ सतत आजारी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जीम्मेदारी एकट्यावर आली होती.

 

सोबतच बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस स्टेशनचे पो.नि.यादव पो.कॉ. अशोक आघाव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला रात्री उशिरा अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

Advertisement

Advertisement