Advertisement

पीएम किसानसाठी राज्यासह बीड जिल्ह्यातूनही परराज्यातील शेतकऱ्यांनी केली नोंदणी

प्रजापत्र | Wednesday, 18/08/2021
बातमी शेअर करा

 बीड दि.१७ (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम किसान योजनेट ठीकठिकाणी होत असलेले अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत परत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. आता महाराष्ट्रातील ठीकठिकाणी परराज्यातील शेतकऱ्यांनी पीएम किसानसाठी नोंदणी केल्याचे समोर आले आहे.  बीड जिल्ह्यात ६४ हजार ९९८ स्वयं नोंदणीकृत लाभार्थी असून प्राथमिक तपासणीत यात अडीचशे व्यक्ती परराज्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राज्य शासनाने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांची शंभर टक्के  तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

 

 

राज्यभरात पीएम किसान योजनेत  परराज्यातील लाभार्थी नोंदविले केल्याचे समोर आले आहे.  स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली होती.  तर इतर ठिकाणी प्राथमिक तपासणी झाली यात बीड जिल्ह्यातील ७४ हजार स्वयं नोंदणीकृत यामध्ये प्राथमिक तपासणीत २४८ व्यक्ती परराज्यातील असल्याचे समोर आले आहे. तर अनेकांच्या आयएफसी कोड वरून त्यांच्या शहरांच्या नेमके ठिकाण लक्षात येत नसल्याचे राज्य शासनाच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. आता जिल्ह्यात नोंदवलेल्या सर्वच्या सर्व सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Advertisement

Advertisement