Advertisement

कारचा अपघात;चौघे जखमी

प्रजापत्र | Monday, 16/08/2021
बातमी शेअर करा

 

 केज दि.१६ – रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने दुभाजक वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला नालीला धडकून झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले असून कारचेही मोठे  नुकसान झाले आहे.

                 दि. १६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास डॅटसन-गो (एमएच-०९/ एफबी-०७७८) ही कार कळंबकडे जात असताना माळेगाव ता. केज जवळील एकेरी रस्ता दुभाजक असलेल्या ठिकाणी कोणताही सूचना देणारा फलक किंवा साइन बोर्ड नाही. त्यामुळे चालकाला दुभाजक न दिसल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून कार नालीला धडकून अपघात झाला. यात कारने प्रवास करीत असलेले चौघे जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून या बाबत युसुफवडगाव पोलीस स्टेशनला अपघाताची उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.

Advertisement

Advertisement