Advertisement

राज्यासोबतच उघडले बीड जिल्हयाचेही लॉक

प्रजापत्र | Saturday, 14/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड-राज्य सरकारने दिलेल्या नवीन आदेशानुसार आता बीड जिल्हयाचेही कुलूप उघडले आहे. रविवार (दि.१५) पासून बीड जिल्ह्यातील सर्व व्यवहार पुर्णवेळ सुरु राहणार असून  हॉटेल,उपहारगृह देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
चार दिवसापूर्वी राज्य सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सुधारित आदेश काढले असून  तब्बल दीड वर्षानंतर बीड जिल्हयाचे कुलूप पुर्णतः उघडणार आहेत.सर्व प्रकारची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. तर उपहारगृह ५०% क्षमतेने पुर्णवेळ सुरु ठेवता येणार आहेत. दीड वर्षापुर्वी पहिल्यांदा लॉकडाऊन सुरु झाले होते त्यानंतर व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मर्यादित वेळ देण्यात येत होती. आता मात्र पुर्णवेळ व्यवसाय सुरु करता येणार आहेत. जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी हे आदेश काढले आहेत.

 

लसीकरण आवश्यक
प्रशासनाने सर्व व्यवसाय पुर्णवेळ सुरु ठेवायला परवानगी दिली असली तरी दुकाने, हॉटेल  यासाठी तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुर्ण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे

 

 

 

Advertisement

Advertisement