Advertisement

 नरेगा  गैरव्यवहारात पाचशेहून अधिक ग्रामसेवकांना नोटिसा

प्रजापत्र | Tuesday, 10/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड : जिल्ह्यात २०१०-११ ते २०१८-१९ या कालावधीत नरेगामध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने चौकशीकडे दुर्लक्ष  केल्याचा ठपका ठेवत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच बदलीचे आदेश दिल्यानंतर आता जिल्ह्यातील प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. या दहा वर्षातजिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी  नोटिसा बजावल्या आहेत. यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा उल्लेख असून त्यावर तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देणार आले आहेत. याप्रकरणात ग्रामसेवक , ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीसह फौजदारी कारवाईच्या पाळली देखील सुरु झाल्या असून यामुळे जिल्ह्यातील प्रशासनात भूकंपासारखे चित्र निर्माण झाले आहे. इतक्या  मोठ्या प्रमाणावर ग्रामसेवकांना एकदाच नोटिसा बजवण्याची कदाचित राज्यातील देखील ही पहिलीच घटना असावी.

 

बीड जिल्ह्यात नरेगामध्ये मोट्ठ्या प्रमाणावर गैरप्रकाराच्या तक्रारी नेहमीच होत असतात , मात्र प्रशासकीय पातळीवर यात तातडीने कारवाई होत नाही. बीड पंचायत समितीत नरेगामध्ये असेच गैरप्रकार झाल्याची याचिकाच राजकुमार देशमुख आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपुइथंत दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने केवळ बीड पंचायत समिती नव्हे तर जिल्हाभरात १० वर्षात झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र यातील चौकशी संथगतीने होत असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने २ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीत थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांवर चौकशी  मिटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या बदलीचे आदेश दिले होते.
त्यानंतर आता जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद प्रशासन देखील जागे झाले आहे.

 

 

यासंपूर्ण प्रकरणात सामाजिक लेखापरीक्षणात जे मुद्दे समोर आले त्यानुसार आता त्या त्या काळातील ग्रामसेवकांना करणे दाखवा नोटिसा वाजवण्यात आल्या असून त्यांना तातडीने खुलासे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी पाचशेहून अधिक ग्रामसेवक, तितकेच ग्रामरोजगार सेवक यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बीड, आष्टी, माजलगाव , वडवणी , गेवराई या तालुक्यांमध्ये नोटिसा बजवण्यात आल्या असून इतर तालुक्यांमध्ये नोटिसा बजावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे २ दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात मात्र खळबळ माजली आहे. 

 

 

हेही वाचा ... 
घाबरू नका, दोन महिन्यापूर्वी झाली होती 'त्या' रुग्णाला डेल्टाची लागण
http://prajapatra.com/2861

   

Advertisement

Advertisement