◆अल्पपरिचय◆
--------------------------
◆जन्म- ५ ऑगस्ट १९५५
◆जन्मस्थळ - रुईनालकोल ता. आष्टी
◆संपुर्ण नांव - भीमसेन आनंदराव धोंडे
◆गांव - रुई नालकोल ता.आष्टी जि.बीड
◆शालेय शिक्षण - रुई नालकोल व कडा
◆उच्च शिक्षण - अहमदनगर
बी.ए.एल.एल.बी.
●क्रिडा - शालेय व महाविद्यालयीन जीवनात कबड्डी व कुस्ती खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेष प्राविण्य.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना १९७५ साली युवकांची पहिली संघटना स्थापन केली. अहमदनगर येथे शिक्षण घेताना विद्यार्थी संसदेचे जी.एस. म्हणुन निवड.
●शेतकरी संघटना - पदवी शिक्षणानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आष्टी मतदारसंघात शेतकरी संघटनेची स्थापना
●विधानसभा सदस्य - १९८० ते १९९५ सलग पंधरा वर्षे विधानसभा सदस्य असताना मतदारसंघात भरीव विकासकामे केली. यामध्ये पाझर तलाव, नाला बंल्डींग, बंधारे, लघु व मध्यम प्रकल्प, रस्ते अशी भरीव विकासकामे केली.
●स्वागताध्यक्ष- १९९७ मध्ये आष्टी येथे झालेल्या मराठवाडा युवक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
●पाटोदा तालुक्यातील हरणाच्या बंदोबस्त करावा व इतर मागण्यांसाठी आष्टी ते बीड पायी मोर्चा.
●कृष्णा खोऱ्याचे पाणी आष्टी तालुक्याला मिळावे याप्रमुख मागणीसाठी आष्टी ते मुंबई ४५० कि.मी. अंतराचा हजारों शेतकऱ्यांसह मंत्रालयावर पायी मोर्चा.
●आष्टी तालुक्यातील मेहेकरी धरणात कुकडीचे पाणी टाकण्याच्या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देऊन सीना ते मेहेकरी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी पुणे येथील सिंचनभवनासमोर मा.आ.भीमसेन धोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस धरणे आंदोलन.
●आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा - आष्टी तालुका व नगर तालुक्यातील ७५ गावाची १ लाख ५४ हजार एकर सुपिक जमिन लष्कराच्या ताब्यातुन वाचविण्यासाठी ५ हजार शेतकऱ्यासह आष्टी ते दिल्ली १५७० कि.मी. अंतराचा यशस्वी ऐतिहासिक पायी मोर्चा काढुन शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी वाचविल्या.
●सत्तेत असो किंवा नसो शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष.
●लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाने व तत्कालीन पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल वीस वर्षानंतर विजयी. वीस वर्षानंतर विजयी झालेले महाराष्ट्र विधानसभेतील एकमेव सदस्य म्हणुन भीमसेन धोंडे यांची वेगळी ओळख.
●२०१४ ते २०१९ या कालावधीत आमदार असताना आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी आणुन शेकडो किलोमीटरचे डांबरीकरणाचे रस्ते केले. तसेच मेहेकरी पट्ट्यातील अनेक गावांसाठी योगदान करुन हा परिसर सुजलाम सुफलाम करण्याठी मा.देवेंद्र फडणवीस, मा.पंकजाताई मुंडे व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत कुकडीचे पाणी सिनातुन लिफ्टव्दारे मेहेकरी धरणात सोडण्याची योजना पुर्ण केली.
●शिक्षण महर्षी- आष्टी मतदारसंघ हा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय नव्हती. या भागात फक्त पदवी पर्यंत शिक्षण मिळत होते ते देखील तालुक्याच्या ठिकाणी होते. आमदार झाल्यानंतर भीमसेन धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील रुई नालकोल येथे दहावी पर्यंत शाळा सुरू केली. त्यानंतर हळुहळू मतदारसंघात शाळा महाविद्यालयाचे जाळे निर्माण केले. कृषी, फार्मसी, इंजिनिअरिंग, अन्नतंत्र, नर्सिंग, वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले आहेत. आज याच शाळा महाविद्यालयातुन मतदारसंघातील गोरगरीब जनता, ऊसतोड कामगार यांची हजारो मुले मुली आपापल्या गावात शिक्षण घेत आहेत. सर्वाधिक सोय मुलींची झालेली आहे. कारण की, पंधरा-वीस वर्षांपूर्वी पालक मुलींना शिक्षणासाठी बाहेर गांवी पाठवत नव्हते त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित होत्या. पण विधानसभा सदस्य असताना व सत्तेत नसताना देखील भीमसेन धोंडे साहेब यांनी मतदारसंघात गावागावांत शिक्षणाची गंगा आणली आहे व सर्व प्रकारचे शिक्षण आष्टी परिसरात उपलब्ध केले आहे.
संकलन- तुषार दिलीपराव काळे
स्वीय सहायक
मा.आ.भीमसेनजी धोंडे साहेब