पत्रकार प्रवीण पोकळे
प्रदीर्घ काळ संघर्षाची वाट चालत असताना, विकासकामांशी असलेले नाते कधीही न तोडण्याची सवय माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी अंगिकारली. त्यामुळे अपयशाचे अनेक अडथळे पार करीत वाटेवर यशाचा सुगंधी बहरही त्यांनी स्वकर्तृत्वाने फुलविला. हा बहर कालांतराने विकासकामांतून सामान्य जनतेच्या घरांमध्येही दरवळू लागला. पदे मिळाली की जनतेची साथ सोडणाऱ्या अनेक राजकारण्यांच्या पंक्तीत न बसता धोंडे यांनी पदांचा उपयोग आष्टी-पाटोदा-शिरूरच्या विकासकामांसाठी कसा होईल, याचा विचार केला. सभागृहात लांबलचक व प्रभावशाली भाषणे झाडण्यापेक्षा विविध खात्यांच्या मंत्र्यांशी सुसंवाद साधून त्यांच्याकडून जिल्ह्यासाठी काही तरी विकासकामे पदरात पाडून घेण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचा विकासातून जो कायापालट झाला त्यात धोंडे यांचा मोठा वाटा आहे.विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.आष्टी विधानसभा मतदार संघाचे तालुक्याचे सलग पंधरा वर्ष आमदार राहीले व पुन्हा 2014 मध्ये निवडून आले.त्यांनी 1980 ते 1995 या कालावधीमध्ये मोठी विकासकामे केली.नंतरच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी सामाजिक कार्यामध्ये कसलाही बदल केला नाही.त्यांनी आमदार असतांना प्रत्येक गावाला जाण्यासाठी रस्ता,तलाव,नळ योजना,विजेची सोय, शाळा,मंदिरे आदी विकासाची कामे केलेली आहेत.आजही ते तितक्याच जिद्दीने व धाडसाने शेतकर्यांचे व सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उभे रहात आहेत.
आष्टी तालुक्याला कुकडीचे पाणी मिळावे म्हणून आष्टी ते मुंबई पायी मोर्चा शेतकर्यांसाठी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढला.माजी आ.भीमसेन धोंडे यांना सलग तीन वेळा निवडणुकीमध्ये अपयश आले तरी,आजपर्यंतचा मागील इतिहास पाहिला तर राजकारणात धोंडे साहेब हे कायम चर्चेत राहून समाजसेवेचे व्रत त्यांनी सोडले नाही.त्याची पावती म्हणून मतदारांनी पुन्हा 2014 साली विधानसभेवर पाठवले.पुन्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाच्या विकासाला चालना मिळालेली आहे. आष्टी मतदार संघ हा सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली आहे.2001 पासून या मतदारसंघातील पाऊस 60 टक्याच्या पुढे गेलेला नाही.त्यामुळे नुसत्याच शेतीवर भागत नाही म्हणून स्थलांतर होत आहे.शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतात त्यालाही कारण सिंचनाच्या अपुर्या सुविधा हेच आहे. त्यामुळे मतदार संघाला खात्रीशीर हक्काचे आणि कायमस्वरूपी पाणी आणणे हेच आपले ध्येय आहे आणि पुढचे राजकारण त्यासाठीच असल्याचे माजी आ.भीमसेन धोंडे म्हणतात.
पुर्वी सरकारचे बजेट कमी असायचे मात्र सरकारमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवेदनशिलता होती,एखादी घटना घडली किंवा एखादा प्रश्न उपस्थित केला गेला तर संपुर्ण सभागृह प्रतिसाद द्यायचे,त्यावर चर्चा व्हायच्या मात्र दुर्दैवाने आता तितकीशी संवेदनशिलता राजकारणामध्ये राहिलेली नाही.असे माजी आ.धोंडे सांगतात.शेती हा महाराष्ट्राचा कणा आहे,मात्र शेतीकडे पहिल्यापासूनच सरकारने फारसे लक्ष दिलेले नाही.आजही त्या भागात सिंचनाच्या सुविधा नाहीत.1980 पासून सोयी आणि सुविधा अपुर्या आहेत.आजपर्यंत खरे तर कृष्णा खोऱ्याचे पाणी आष्टी भागात यायला हवे होते.मात्र ते आलेले नाही आणि सिंचनाशिवाय प्रगती होत नाही हे वास्तव आहे.एकदा शेतकर्यांना खात्रीशिर पाणी मिळाले की तो प्रगती करू शकतो म्हणूनच सरकारने सिंचनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे धोंडे साहेबांना नेहमीच वाटते.शेतकरी उपाशी आहे,त्याच्या पोटाला अन्न आणि हाताला काम देणे हे महत्वाचे आहे.त्याला इतर गोष्टींचा काय उपयोग आणि यासाठी पाणी गरजेचे आहे.ज्या भागात पाणी आहे तेथे शेतकर्यांच्या आत्महत्या होत नाहीत.शेतकरी आत्महत्येकडे निव्वळ एक प्रकरण म्हणून पाहून चालणार नाही.एकेकाळी कधीतरी एखादी आत्महत्या झाली तर संपुर्ण सभागृह गंभीर व्हायचे आता राज्यात रोज चार आत्महत्या होत आहेत.
शेतीसाठीची धोरणे बदलावी लागणार आहेत.असे धोंडे साहेबांचे मत आहे.जर आरनाल्डो नावाचा नट वयाच्या 75 व्या वर्षी हॉलीवूडमध्ये नायक म्हणून काम करू शकतो तर धोंडे साहेबांना काय अडचण आहे.मुळात लहानपणापासूनच धोंडे साहेबांवर व्यायामाचे संस्कार आहेत.4 थीला असतांना त्यांची आई त्यांना सोडून गेली,मात्र आजीबा,वडिल,काका पहाटेच व्यायामाला न्यायचे.त्यांची मुलंही व्यायाम करतात,खेळतात.या व्यायामाचा आणि खेळाचा एकंदरच परिणाम धोंडे साहेबांच्या शरीरावर झाला.त्यांनी ते सातत्य आजपर्यंत टिकदून ठेवलेले आहे.खेळ हा तर त्यांच्या आवडीच विषय आहे,जर धोंडे साहेब आज पर्यंत खेळत राहिलो असते तर प्रो कबड्डीमध्ये त्यांची किंमत कोटयावधीमध्ये झाली असती.महाविद्यालयीन जीवनापासून ते सातत्याने खेळत आलेले आहेत.कुस्ती,कबडी,अॅथलेट आदी प्रकारामध्ये ते पुणे विद्यापीठाच्या संघात कायम असायचे.त्यामुळे वर्षातले तीन चार महिने ते पुण्यातच असायचे.खेळत असतांनाच विद्यालयीन जीवनातच 10 टक्के भारत देश त्यांनी पाहिला आणि यातूनच एक खिलाडू वृत्ती त्यांनी आयुष्यात जोपासली,ज्याचा त्यांना आजही उपयोग होतो.तसा राजकारण हा माझा विषय त्यांचा नव्हता पण त्यांच्याबददल प्रत्येकाला आकर्षण असायचे.सत्तेत असतांना आणि नसतानांही ते जेथे कोठे जातात तेथे लोक जमतात.हे केवळ आजचे नाही तर महाविद्यालयीन जीवनातही तेच चित्र असायचे.
ते कॉलेजला असतांना त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांचा घोळका कायम असायचा.कबड्डी आणि कुस्तीमध्ये ते त्यावेळी सर्वपरिचीत होते.त्यानंतर कुस्ती आणि कबड्डीमुळे त्यांचा परिसरातील अनेक गावांमध्ये परिचय झाला.त्याचवेळी ते आष्टीच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष झाले.नेमकेच त्यावेळी मतदार यादीतही त्यांचे नाव समाविष्ट झाले होते.शेतकरी संघटनेकडून त्यांनी निवडणूक लढवावी असा विचार कार्यकर्त्यात झाला आणि घरच्यांशी बोलून त्यांनी ती निवडणूक लढविली अन् ते दोन हजार मतांनी पराभूत झाले.परंतु परिसरात आपल्या मागे उभे राहणारे लोक भरपूर आहेत.याचा अंदाज त्यांना आला.त्यानंतर दोनच वर्षांनी पुन्हा निवडणुका झाल्या आणि ते 15 ते 20 हजार मतांनी निवडून आले आणि मग राजकारणात रूळत गेले.जलयुक्त शिवार ही अत्यंत चांगली योजना आहे.नदी-नाले सरळ करणे, रूंद करणे,खोलीकरण करणे यावर जास्त लक्ष दिले जावे असा धोंडे साहेबांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे.ज्या कामाला 15 लाख रूपये लागतात तो सिमेंट बंधारा धोंडे साहेबांनी त्यांच्या काळात केवळ सव्वालाखात बांधला होता. विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या धोंडे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा