Advertisement

अर्धचक्र चालवावेच लागेल  

प्रजापत्र | Tuesday, 03/08/2021
बातमी शेअर करा

 

महाराष्ट्र कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर जे निर्बंध लावले आहेत ते शिथिल  करण्यासंदर्भात आणि व्यवसायाच्या वेळा वाढवून देण्यात संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र त्याचे आदेश अजून निघाले नाहीत,  म्हणून राज्यभरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत सरकार आदेश काढणार असेल तर आम्ही पूर्णवेळ दुकाने उघडू अशी भूमिका पुण्य,मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली.  त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही जिल्ह्यात ८ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवायला परवानगी देऊ अशी घोषणा केली. मात्र हे किती दिवस राहणार हा प्रश्न आहे.  पुणे, मुंबई काय किंवा बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील छोटा व्यापारी काय? प्रत्येक ठिकाणची परिस्थिती सारखीच आहे.  कोरोना वाढतोय असे कारण शासन आणि प्रशासन  मनात येईल तेव्हा निर्बंधांचे हत्यारे उचलते आणि सारा व्यापार ठप्प होतो. हे देखील  समजण्यापलिकडचे आहे. सकाळी सात ते साडेबारा इतकाच वेळ दुकाने उघडी ठेवली आणि त्यानंतर दुकाने बंद केली तर त्याचा कोरोना प्रसार रोखण्याशी  समंध कसा येणार?  हे प्रशासनात बसलेले अधिकारीच  जाणोत. उलट व्यवसाय सुरू ठेवण्याचा वेळ कमी असेल तर त्या कमी वेळात आपल्या रोजच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढणार आणि कोरोनाचा प्रसार व्हायचा असेल तर या वाढत्या गर्दीतूनच होईल ही वेळ जर वाढली तर प्रत्येक जण आपल्या सोयीने खरेदीसाठी येऊ शकतो. मात्र याबद्दल डोळसपणे विचार करायला प्रशासनातील अधिकारी तयार नाहीत.  अमुक एक व्यवसाय बंद ठेवला म्हणजे कोरोना थांबतो हे तर्कटच मात्र चुकीचे आहे किराणा दुकान सुरू आहे आणि त्याच्या बाजूचे कपड्याचे दुकान बंद असेल तर किराणा दुकाना वर सामान घ्यायला येणाऱ्या लोकांना कोरोनाची भीती नसते का? मग नेमके एका शहरातील काही व्यवसाय बंद ठेवायचे, काही व्यवसाय सुरू ठेवायचे एका जिल्ह्यातील चार तालुक्यात दुपारपर्यंत व्यवसाय सुरू ठेवायचे असले तरकट लढवून कोरोना कसा थांबणार आहे.

          याही पलीकडे जाऊन शासन आणि प्रशासनाला भलेही निर्बंधामध्ये स्वारऱ्य वाटत असेल परंतु शासनाला किंवा प्रशासनाला वाढते त्यावरून विषाणूंची कार्यपद्धती ठरत नसते.  उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आदी राज्यांमध्ये निर्बंध तितकेसे कडक नव्हते.  त्यामुळे त्या राज्यांमध्ये सामूहिक प्रतिकार क्षमता (हर्ड इम्मुनिटी) बऱ्यापैकी आलेली आहे.  

कोणत्याही साथीत  ती साथ संपवायची असेल तर समाजातील मोठ्यात मोठ्या घटकांमध्ये आणि सर्वाधिक प्रमाणात जोपर्यंत लोक बारीक होत नाही.  तोपर्यंत त्या विषाणूंचा प्रभाव संपत नसतो.  मानवी शरीराला त्या विषाणूंचा ओळख एक तर दोन संघाच्या माध्यमातून किंवा तिच्या माध्यमातून होऊ द्यावी लागते हा आजपर्यंतचा सात रोगाचा अभ्यास आहे अनेकांनी सरकारच्या कानीकपाळी ओरडून या गोष्टी सांगितल्या आहेत मात्र या कोणत्याच गोष्टीवर सरकार विचार करायला तयार नाही उठ सुठ लादलेल्या  निर्बंधामुळे व्यापारचक्र पूर्ण थांबलेला आहे. कितीतरी लोक बेरोजगार झाले आहेत. जे लोक पूर्वी  स्वतःचे  हॉटेल चालवायचे ते आता दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत. आहेत या माध्यमातून मिळणारा पगार वाढला असला तरी जीएसटीच्या   माध्यमातून मिळणार कर वाढला असला तरी जीएसटीचा  कर  भरणाऱ्या दात्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात घटली आहे.  याचा अर्थ अनेक उद्योग बंद पडले आहेत किराणा दुकान बंद पडले तर त्याच्यावर किमान पाच-सहा कुटुंब थेट अवलंबून असतात. 

 

एक हॉटेल बंद ठेवायचे म्हटले तर त्यावर हॉटेलातील भांडी घासणाऱ्या महिलेपासून ते हॉटेलच्या मालकापर्यंत पंधरा-वीस कुटुंबे अवलंबून असतात निर्बंधाच्या नावाने आपण कोरोना थांबवत आहोत असा समज करुन घेतलेले सरकार निर्बंधांमुळे जी कुटुंबे देशोधडीला लागले आहेत त्यांचा विचार करणार आहे का? शेवटी प्रत्येकाच्या सहनशक्तीला मर्यादा असतात आणि भूक किती दिवस सहन करायची यालाही मर्यादा असते याचा विचार करून अर्थचक्र चालवावे लागेल हे ध्यानी ठेवून सरकारला निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Advertisement

Advertisement