Advertisement

अनधिकृत बायो डिजल विक्री संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रजापत्र | Tuesday, 03/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

बीड- आज बीड जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशन तर्फे मा. जिल्हाधिकारी जगताप साहेब यांना अनधिकृत बायो डिझल विक्री संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व पेट्रोल पंप डीलर्स नी बायो डिझेल विषयी जिल्हाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून लवकरच आणखी मिटींगला बोलविण्यात येईल असे आश्वासन दिले व नंतर जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांचीही भेट घेतली व निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देताना बीड जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष मा. शरद खरात जिल्हा उपाध्यक्ष सचिन जगताप, सत्यसेन मिसाळ, राजेंद्र सोनवणे, कसबे साहेब, राजेंद्र मंत्री, इंजिनीअर मिसाळ सर, माजी जिल्हा अध्यक्ष  मोहम्मद मुदस्सीर भाई, घुमरे सर, श्रीकांत कुटे, नाविद सय्यद, माने साहेब, रोहित सर्वज्ञ, शुभम पोकळे, शाफिक भाई फारोकी, दत्ता महाजन, जोगदंड साहेब, मोहम्मद खान बीड जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशन प्रसिद्धी प्रमुख यांच्यासह अनेक BPCL, HPCL, IOCL, Reliance डीलर उपस्थित होते.

 

 

हेही वाचा ... 

वाळूच्या अवैध वाहतुकीमुळे रस्त्यांची कामे बंद                      

http://prajapatra.com/2796

 

Advertisement

Advertisement