Advertisement

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अधुरे  

प्रजापत्र | Thursday, 29/07/2021
बातमी शेअर करा

 

 धारूर दि.२९ जुलै - सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणास पहाटे पाच वाजताच्या सुमारास पीकअपने पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. उमेश परमेश्वर घुले असे मृत तरुणाचे नाव आहे. धारुर तालुक्यातील गांवदरा येथे हा अपघात  झाला. उमेश परमेश्वर घुले (वय १८)  रा.गांवदरा ता.धारुर हा सैन्य भरतीसाठी  प्रयत्न करत होता. गांवदरा येथील अनेक तरुण गावातून जाणाऱ्या खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्गावर दररोज व्यायाम करतात. याच महामार्गावर तरुण रंनिंगची प्रॅक्टिस करतात.

 

मिल्ट्री, पोलीस भरतीसाठी पुर्व तयारी करण्यासाठी गावंदरा ते आंबेवडगाव या मार्गावर रंनिंगसाठी गेलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. आज गुरुवारी पहाटे ५ ते ६ वाजेच्या दरम्यान युवक व्यायाम करत असतांना अज्ञात वाहनाने उमेश परमेश्वर घुले (वय १८) यास जोराची धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला.मालवाहु बोलेरो पिअकपने तरूणास उडवल्याचे सांगितले जात आहे. अपघात  होताच जखमी तरुणास अंबेजोगाई येथे रूग्णालयात हालवण्यात आल्याचे समजते. मात्र उपचार सुरु असतानाच तरुणाची प्राणज्योत मावळली. अद्याप या प्रकरणी पोलिसात  गुन्हा दाखल झाला नव्हता. तरुणाच्या अपघाती निधनामुळे गांवदरा गावात शोककळा पसरली.

 

 

 

Advertisement

Advertisement